Tuesday, January 27, 2015

एक नवीन विचार (मराठी)



कोरा कागद नव्हतंच माझ मन कधी,  
होते कोरलेले त्यावर चित्र हजार,
तू आलीस घेऊन तुझ्या प्रीती चे खोड रबर,  
प्रेमाचे माझ्या हि होते प्रयत्न फार,
नव्याने फुलले माझे मन प्रिये,  
आणि उन्हाळ्यातच जीवनात माझ्या आली बहार,
प्रेमाच्या पावसात तुझ्या न्हाउन निघालो मी,  
नवी पालवी फुटली आणि जुने झाले सगळे पसार,
मनोराज्या वर आता तुझेच झाले शासन,  
भरले आता राणी तिथे, तुझेच दरबार,
एक एक करून दिवस जाता जाता ,  
२६ वर्षांचा झाला आपला संसार,
कळलेच नाही केंव्हा मुली मोठ्या झाल्या,  
आई बाप नाही आपण झालो दोस्त यार,
कैफ तुझ्या प्रेमाचा असा काही चढला, 
मला नाही दिसले असतील किती हि मीना बझार|
तू आता म्हणशील पुरे कर हा चावटपणा,
 काय रंगात आलाय माझा म्हातारा भरतार,
मी म्हणेन असू दे गा राणी ,  
नव्या वर्षात हा आहे एक नवीन विचार|

No comments: