Friday, January 30, 2015

तेरे बिना (मराठी)

तुज विन सख्या रे.....
रात्र विषारी, दिवस बोचरे, 

सांग सख्या मी जगू कसे रे,
तुज विन नाही चैन पडे |
तुज विन सख्या रे......
काय करावे, कसे करावे, 

परत कसे ते दिवस फिरावे,
तू पण काही सांग गडे |
तुज विन सख्या रे ......
सूर सजे ना, ताल जमे, 

बेताले बेसुर गाणे हे, आजीवन मी म्हणू कसे,
गाण्या विन सगळेच् अडे |
तुज विन सख्या रे......
आठवून बेचैन करे मज,गंध तुझा, तो स्पर्श तुझा,

विरहा नंतर मीलन एक दिस,
त्यातही कर्तव्य नडे |
तुज विन सख्या रे ....

No comments: